Welcome to Sevenmantras
'ENTER YOUR POSTAL PINCODE' to check avalibility of Delivery Service at your location
Book orders 2 days in advance. Delivery Days : Tue, Thu, Sat, Sun.
‘ॲग्रोवन’चा ‘सेव्हन मंत्रा’ उपक्रम;
आजपासून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये
शास्त्रोक्त पद्धतीने पिकविलेला भाजीपाला व फळे शेतातून आता थेट आपल्या घरात उपलब्ध होणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारपासून (ता.९) ही सुविधा सुरू होत असून, या योजनेच्या शुभारंभालाच ग्राहकांनी आगाऊ नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मला एकदम ताजी भाजी आणि दर्जेदार फळे घरपोच मिळाली. त्याचे पॅकिंग अत्यंत चांगले आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केले होते. आम्हाला हवा तसा ताजा भाजीपाला मिळाला, याचा मनापासून आनंद आहे,’ अशा शब्दांत मंगळवारी ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाला आणि फळे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्राहकांच्या दारात पोचविण्याच्या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
ताजा भाजीपाला तोही पूर्णपणे सुरक्षित मिळत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी ‘ॲग्रोवन’च्या पुढाकाराने सुरू केलेल्या ‘सेवन मंत्रा’ भाजीपाला-फळे थेट घरपोच देण्याच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजीपाला आणि फळांच्या बास्केटसाठी मागणीही वाढली आहे.
पावसाळ्यात चांगल्या भाज्या मिळत नाहीत; पण या बास्केटमध्ये ताज्या, स्वच्छ आणि कोरड्या भाज्या असतात. त्यामुळे बाहेरून भाज्या आणण्याची कटकट मिटली आहे.
- सविता जाधव, सहकारनगर
पावसाळ्यात चांगली आणि स्वच्छ भाजी मिळणे अवघड असते. मात्र, ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाला व फळे उपक्रमात आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातही स्वच्छ, ताजा आणि आरोग्यपूर्ण भाजीपाला तसेच फळे घरपोच मिळणार आहेत.